डोळ्यांच्या ऑपरेशन बद्द्ल जाणून घ्या ह्या ५ गोष्टी

आजचा लेख हा माझी मैत्रीण आणि आरोग्य ब्लॉगर mansisword ने लिहिलेला आहे.

आपण या लेखाच्या शेवटी मानसी आणि तिच्या ब्लॉगबद्दल अधिक वाचू शकता. तर, चला सुरुवात करूया!

डोळे हे आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण डोळयांच्या आजाराविषयी किंवा ऑपरेशनबद्दल ऐकतो तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकते, बरोबर ना?

आपल्या मराठीत १ म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणून ऑपरेशन पूर्वी आपले मन शांत ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपली ऑपरेशन सुखरूप होईल आणि हे फक्त डोळयांच्याच नाही इतर ऑपरेशनच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवा.

डोळ्यांच्या ऑपरेशनपूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

१. स्थिरता

मनाची शांतता आणि स्थिरता ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पण ज्या वेळी आपण ऑपरेशन हा शब्द जरी ऐकतो आपण खूप घाबरतो. पण स्वतः ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मला माहित आहे ही भिती ऑपरेशनपेक्षा आपला स्वावलंबी पणा गमावण्याची असते. माझ्या डोळ्यांच्या कक्षातील पोस्टिंग च्या वेळी बहुतेक पेशन्ट मला म्हणायचे, “ऑपरेशन नंतर माझ्या डोळ्यावर पट्टी असेल, मी माझी दिनक्रिया कशी करेन? माझी सून ऑफिसला जाते मग घरी कोण जेवण बनवणार? मी सगळं कसं सांभाळणार? माझ्या डोळ्यात ड्रॉप कोण टाकणार?”

हे ऐकून मी फक्त एवढच म्हणायचे, ” प्रत्येक शंकेला निरसन असते”, बरोबर की नाही? डोळ्यांना पट्टी थोडया वेळासाठीच असणार. आणि प्रत्येक मूल आपल्या आई वडिलांची काळजी घेतोच. तुम्ही तुमच्या मुलांसाठी केले आता त्यांची जबाबदारी. तुम्ही जस तुमच्या मुलांवर जीवापाड प्रेम करता तस तुमची मुलं ही तुमच्यावर नितांत प्रेम करतात. आणि ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये आणून त्यांनी ह्याची प्रचिती पण दिली आहे, बरोबर ना?

जर तुम्ही जास्त विचार केलात तर तुमचा रक्तदाब वाढू शकतो, आणि ज्या मुळे डॉक्टराना तुमची ऑपरेशन पुढे धकलावी लागू शकते.

दिर्घ श्वास घ्या. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने तुम्हाला शांत राहण्यास मदत होईल. आणि जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर छानशी मनाला शांतता देणारी गाणी ऐका.

२. शंका निरसन

ऑपरेशन बद्द्ल आपल्याला भरपूर प्रश्न असतात, जसे की ऑपरेशन कशी करणार आहेत? किती वेळ लागेल? भूल कोणत्या पद्धतीने देणार आहेत?

तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही डॉक्टरांना, किंवा जवळील आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑपरेशनसाठी तयार राहू शकता.

३. ऑपरेशनपूर्वीची तयारी

तुम्हाला माहीत आहे का १ ऑपरेशन होण्यापूर्वी कित्येक आरोग्य कर्मचारी ती सुखरूप पार पाडण्यासाठी कार्यरत असतात.

ह्या कृतीना घाबरून जावू नका. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्या समजून घ्या आणि त्यांना सहकार्य करा.

मला माझ्या ट्रेनिंग काळातला एक किस्सा आठवतो. माझा वॉर्ड मधला दुसराच दिवस होता. आणि मला सिनिअर डॉक्टरांनी ऑपरेशन पूर्वीच्या सगळ्या कृती करून घेण्यास सांगितले, जसे की सम्मती पत्रकावर सह्या घेणे, डोळ्यात ड्रॉप्स टाकणे, केस धुण्या बद्द्ल सांगणे, केसात तेल घालू नये ह्या बद्द्ल सांगणे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या पापण्या कापणे, घाबरलात ना? माझ्या सोबत पण हेच झाले होते. मी पण घाबरले होते. हे ऐकल्यावर मी म्हटले होते, अरे देवा पापण्या कोण कापत? मी कशी कापणार? आणि जर त्यांना लागलं तर मी काय करणार?

ह्या सगळया गोष्टीमुळे मी गोंधळून गेले होते. नंतर मी सोबतच्या डॉक्टर आणि नर्सेस सोबत बोलून घेतलं, तेव्हा मला समजलं की हे त्यांच्यासाठी नेहमीच आहे आणि ऑपरेशनपूर्वी हे कराव लागत.

मी कृतीसाठी ट्रे तयार केला, त्यात कात्री, कापूस अस सामान घेतले आणि रुग्णाजवळ गेले, पण मनात भीती होतीच. आणि पुढे जे काही झाले त्याचा विचार मी कधीच केला नव्हता.

त्या रुग्णाने मला ट्रे घेऊन येताना बघितल आणि म्हणाले, “बेटा, तू पापण्या कापण्यासाठी आलीस ना? ये.” मला धक्काच बसला. मी त्यांना विचारल, “काका तुम्हाला कस माहिती?” तेव्हा ते म्हणाले की काही महिन्यांपूर्वी त्याच्या दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची पूर्व कल्पना होती.

ह्या गोष्टीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी न घाबरता त्यांच्या पापण्या कापल्या. ज्या वेळी असे आत्मविश्वास वाढवणारे आणि सहकार्य करणारे रुग्ण आम्हाला ही बळ देतात.

तुम्हाला कधी रुग्णालयात असा अनुभव आला आहे का? असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला खूप आवडेल तुमचे अनुभव ऐकायला.

४. आहार

ऑपरेशनपूर्वी तुम्हाला काही काळ उपाशी राहावं लागतं, तुमच्या डॉक्टरांशी त्या संदर्भात बोलून घ्या.

ऑपरेशनच्या आदल्या रात्री साध जेवण घ्या. आणि डॉक्टरांशी ऑपरेशन नंतरच्या आहाराबद्द्ल ही बोलून घ्या, कारण की ऑपरेशन नंतर काही दिवस तुम्हाला कडक पदार्थ वर्ज्य असतील.

५. औषधे

तुम्हाला जर मधुमेह, रक्तदाब ह्या सारखे आजार असतील तर ऑपरेशन पूर्वी त्यांची औषधे घ्यायची की नाही, आणि कधी घ्यावी याची खातरजमा डॉक्टरांकडून करून घ्या.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे चुकवू नका किंवा अधिक घेऊ नका.

सारांश

  • ऑपरेशनसाठी घाबरू नका.
  • श्वासनाचे व्यायाम करा.
  • तुमच्या शंकाचे निरसन डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करून घ्या.
  • प्रत्येक ऑपरेशन आधी आणि नंतरच्या सर्व क्रिया आवश्यक असतात त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा.
  • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा डॉक्टरांवर पूर्ण पणे विश्वास असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवाल तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात फिरेल आणि तुम्हाला लवकर बरे करण्यास मदत करेल.

आता माझ्या बद्दल थोडेसे

नमस्कार, मी मानसी, मुंबईकर. मी मागील १५ वर्षा पासून आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

ब्लॉग लिहीन हा माझा छंद आहे, ज्याचे मी माझ्या व्यवसायात रूपांतर केले आहे. मी हेल्थ ब्लॉगर आहे, आणि मी माझे ब्लॉग आठवड्यातून एकदा माझ्या वेबसाईटवर mansisword.co.in वर पोस्ट करते.

मी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वेबसाईटवर माहितीपूर्ण ब्लॉग आणि त्यांच्या सोसिअल मीडिया अकाउंट योग्य ते माहिती पुरवून त्यांचा व्यवसाय वृध्दिंगत करण्यास मदत करते.

ह्या सोबतच मी नवीन ब्लॉगर्सना त्यांचा ब्लॉगिंग चा व्यवसाय सुरु करण्यास मदत करते. आणि सामान्य आरोग्य आणि मासिक पाळी विषयी शिक्षण देते.

मला वाचनाची आवड आहे. पुस्तके आणि कडक कॉफी मला फार प्रिय आहे. मला नवनवीन जागा आणि अन्न ह्यांचा आस्वाद घ्यायला फार आवडते.

तुम्हाला जर सामान्य आरोग्य किंवा माझ्या व्यवसायाविषयी माहिती हवी असेल तर मला mansim598@gmail.com वर संपर्क करू शकता.

मी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आरोग्य आणि ब्लॉगिंग विषयी माहिती पोस्ट करते, तुम्ही ते खालील लिंक्सवर बघू शकता. आणि आवडल तर नक्की मला फोलो करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत ती माहिती पुढे पाठवत रहा.

www.instagram.com/mansisword

https://www.facebook.com/mansisword/

खूप सारं प्रेम. काळजी घ्या. आरोग्यदायी आणि सुखरूप रहा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s